आबलोलीतील भोसले परिवारचे आयोजन; शिवजयंती निमित्त निबंध स्पर्धा
गुहागर, दि. 24 : आबलोली शिवजयंती निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली. व आयुर्वेदिक उपचार करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ग्रामपंचायतचे सदस्य आशिष राजाराम भोसले आणि परिवाराच्या वतीने आबलोली वरची पागडेवाडी येथे आयोजित केला होता. Honoured of Ayurvedic healers

वर्षानुवर्षे आपल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करणारे आणि प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या आबलोली परिसरातील आयुर्वेदिक उपचार करणाऱ्यांचा शिवजयंती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Honoured of Ayurvedic healers
आजही ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचार पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा आयुर्वेदिक उपचार करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन भोसले परिवाराने केलेल्या कार्यक्रमाचे सरपंच श्रावणी पागडे, उपसरपंच तुकाराम पागडे, संमोहन तज्ञ संतोष वैद्य आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. Honoured of Ayurvedic healers
यावेळी आयुर्वेदिक औषध देणारे आबलोलीतील शिवराम कदम, उदय सुर्वे, प्रमोद कदम, सुरेश कदम, सदानंद निमूणकर, परशूराम लोकरे, सुभाष बहूतूले. खोडदेतील संतोष गूरव, तानाजी साळवी, सुभाष डिंगणकर. मासूतील देवजी मास्कर आवरेतील काशिनाथ घाणेकर, रघुनाथ . व पालशेत मधील शांताराम पवार, श्वेता पवार, गोविंद पवार यांना सन्मानित करण्यात आले. Honoured of Ayurvedic healers
तसेच शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्वी थोरसे, द्वितीय क्रमांक रूद्र साळवी, तृतीय क्रमांक स्वरूप डिंगणकर, उत्तेजनार्थ सृष्टी नेटके, अमेय हातिसकर यांना गौरविण्यात आले. Honoured of Ayurvedic healers
उपस्थित सर्व मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनावर आधारित पुस्तकाचे वाटप करण्यात आले. संमोहन तज्ञ संतोष वैद्य यांनी मानवी जीवनात सकारात्मक मानसिकते साठी संमोहनाचे महत्व या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच श्रावणी पागडे, उपसरपंच तुकाराम पागडे, संमोहन तज्ञ संतोष वैद्य, सुयश वैद्य, ग्रामपंचायत सदस्य पूजा कारेकर, आयोजक आशिष भोसले, सुनील भोसले, श्रीकांत कदम, कृष्णा उकार्डे, महेश दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले तर आभार प्रदर्शन आशिष भोसले यांनी केले. Honoured of Ayurvedic healers

