प्रबोधनकार शिवचरित्र पर व्याख्याते; अशोक कृष्णा भाटकर, रत्नागिरी
गुहागर, दि. 24 : जिल्हा परिषद आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ शाळेच्या पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९२ वी जयंती सोहळा पार पडला. हा कार्यक्रम निर्मल ग्रामपंचायत सडे जांभारी व जिल्हा परिषद शाळा सडे जांभारी नं.१ व २ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबलोली केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र कुळये यांनी केले. Shiva Jayanti in Sadejambhari

ग्रामीण भागामध्ये खुल्या मंडपामध्ये प्रबोधनकार शिवचरित्र पर व्याख्याते अशोक कृष्णा भाटकर (रत्नागिरी केंद्रप्रमुख ) यांनी उत्तम प्रकारे, रयतेचा राजा शिवछत्रपती या विषयावर मार्गदर्शन केले. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती करून देणे ही संकल्पना सर्वांना आवडली. Shiva Jayanti in Sadejambhari
सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, चंद्रकला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाईत, सरपंच अंकुश माटल, उपसरपंच वनिता डिंगणकर, ग्रामसेविका रसिका माटल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश माटल, स्नेहल सूर्वे, सामुदायिक आरोग्य उपकेंद्र अधिकारी नाटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद वेलुंडे, पोलीस पाटील प्रभाकर सुर्वे, राजेश सोलकर तसेच वाडी प्रमुख महादेव माटल, रत्नाकर सोलकर, पांडुरंग बारस्कर, गणपत वेलुंडे, यशवंत डिंगणकर, माजी अध्यक्ष संतोष वेलुंडे, गणेश माटल, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते. Shiva Jayanti in Sadejambhari

