गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या गुहागर येथील “कन्हैया प्ले स्कुल” ला आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव युवा नेते श्री.अनिरुद्ध निकम यांनी भेट दिली. तसेच श्री. साहिल आरेकर यांच्या संकल्पनेतुन शैक्षणिक क्षेत्रात आरेकर प्रतिष्ठान अत्यंत चांगले उपक्रम राबवितात. असे संस्थेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. Aniruddha Nikam’s visit to Kanhaiya Play School


यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.साहिल आरेकर , उपाध्यक्ष श्री. शुभम भायनाक, सह्याद्री शिक्षण संस्था MBA कॉलेज व्यवस्थापक. श्री. तुषार बिजितकर , राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष श्री.रोहित मालप , उपाध्यक्ष श्री.सौरभ भागडे , संस्थेचे संचालक श्री.प्रसन्न कनगुटकर, श्री. अभिषेक भोसले , श्री. विनायक आरेकर आदी उपस्थित होते. Aniruddha Nikam’s visit to Kanhaiya Play School


श्री. अनिरुद्ध निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री.पद्माकरशेठ आरेकर यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. Aniruddha Nikam’s visit to Kanhaiya Play School

