• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परचुरीमध्ये 45 ब्रास वाळु साठा जप्त

by Manoj Bavdhankar
February 19, 2022
in Guhagar
16 0
0
45 Brass sand Stocks Seized in Parchuri

45 Brass sand Stocks Seized in Parchuri

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर महसूल विभागाची कारवाई

गुहागर, ता.19 :  तालुक्यातील परचुरी येथे अवैद्य वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली असून 45 ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या पाच बोटी गायब आहेत. येथे वाळू उपसा करणारे भैये जंगलात पळून गेल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri

परचूरी येथे अवैद्य वाळू व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी याची दखल घेत गेले चार दिवस सर्कल अधिकारी  व तलाठी यांची टिम परचूरी येथे जात होती. परचूरी गावात वाळू उपशासाठी असलेली भैंयांची टिम तलाठी वर्गाला दिसली. त्यांची आधारकार्ड दाखवण्यास मागितले असता, आपण पकडले जाणार या भितीने भैंयानी जंगलातून पलायन केले. यामुळे वाळू उपसा बंद झाला. परंतू यापूर्वी उत्खनन केलेली वाळू परचूरी गावात तीन ठिकाणी वाळू साठा करून ठेवण्यात आला होता.  शुक्रवारी तहसिलदार  सौ. प्रतिभा वराळे यांनी परचूरी येथे भेट दिली असता तीन ठिकाणी वाळू साठा झाडांच्या फांद्यांमध्ये दडवून ठेवलेला होता. महसूल विभागाने  हा अवैद्य वाळू साठा जप्त केला असून ज्या जागेत सापडला त्या जागा मालकाला महसूल विभागाने नोटीस काढून सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणी नंतर जागा मालक अथवा वाळू व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. या महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैद्य वाळू व्यवसाय करणाऱ्यांची धावपळ उडाली आहे. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri

परचूरी खाडीत गस्त राहणार- तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे

परचूरी येथे अवैद्य वाळू उत्खनन व व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध झाले असून परचूरी खाडीमध्ये कायमची गस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख तेथील ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यात देण्यात यावी, अशी सक्त ताकीद तेथील पोलिस पाटील यांना देण्यात आली आहे. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri

Tags: 45 Brass sand Stocks Seized in ParchuriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.