फ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता
गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने विजेतेपद पटकावले. तर पिंपळादेवी वरचापाट संघाने उपविजेता पद पटकावले. Kabaddi Tournament in Guhagar


श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने पिंपळादेवी वरचापाट गुहागर संघावर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. श्रीराम दत्तसेवा आरे संघाने शिव दुर्गा वरचापाट संघावर तर पिंपळादेवी संघाने नवोदित सिद्धेश्वर वेलदूर संघावर मात करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. Kabaddi Tournament in Guhagar


या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू व चढाईकार राज भोसले (आरे), उत्कृष्ट पकड सौरभ नरवणकर (पिंपळादेवी), बोनस किंग साहिल तोडणकर (पिंपळादेवी), अंतिम सामन्यातील सामनावीर अविनाश शेटे (आरे), यांची निवड करण्यात आली. विजेता व उपविजेत्या संघास रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. Kabaddi Tournament in Guhagar
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश मोरे, श्यामकांत खातू, सागर मोरे, रोहन विखारे, अनिकेत भोसले, जयदेव मोरे, अजय खातू, सुहास सुर्वे, सुनील गोयथळे, प्रवीण कनगुटकर आदी उपस्थित होते. Kabaddi Tournament in Guhagar