• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत आरोग्य शिबीर

by Ganesh Dhanawade
February 16, 2022
in Health
17 0
0
Health camp in Patpanhale

ग्रामपंचायत पाटपन्हाळे

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूणातील अपरान्त, नँबचे डाँ. करणार तपासणी

गुहागर, ता.16  : तालुक्यात पाटपन्हाळे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून. १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत दि. १९ फेब्रुवारी रोजी आरोग्य विषयक महाशिबिराचे आयोजन केले आहे.  अशा माहिती सरपंच संजय पवार यांनी दिली. Health camp in Patpanhale 

पाटपन्हाळे ग्रा.पं. नेहमीच शासनाच्या विविध स्तरावरच्या योजना राबविणे, स्वच्छता, आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या लक्ष ठेवून उपाय योजना करीत असते. कोरोना काळातही कोरोना संबंधातील उपाययोजना, जनजागृती करुन कोरोनाला हद्दपार करीत शासनाच्या पारितोषिकास पात्र ठरलेली ग्रामपंचायत आहे. घनकचरा यासाठीही या ग्रामपंचायतचे योग्य नियोजन आहे. सरपंच संजय पवार, उपसरपंच उमेश कदम, सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल व ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून मेहनत घेतली होती. Health camp in Patpanhale 

आरोग्य विषयक महाशिबिरामध्ये ४० वर्षावरील व्यक्तींची मधुमेह तपासणी करुन औषधोपचार पुरविणे, वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करणे, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करुन आवश्यक औषधोपचार पुरविणे तसेच वृद्धांकरिता चष्मे व आधारकाठी पुरविणे अशा प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. यासाठी अपरान्त हाँस्पीटलचे डॉ. अक्षय चौगुले, डॉ. गौतम कुलकर्णी, डॉ. भक्ती पालांडे व डॉ. प्राजक्ता जाधव असे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. Health camp in Patpanhale 

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, पोलीस निरीक्षक श्री. जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जहांगीर उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिराचा लाभ फक्त ग्रा.पं. पाटपन्हाळे हद्दीतील मतदार ग्रामस्थांनाच देण्यात येणार आहे. पाटपन्हाळे गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संजय पवार यांनी केले आहे. Health camp in Patpanhale 

Tags: GuhagarGuhagar NewsHealth camp in PatpanhaleLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.