• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत हळद लागवड प्रशिक्षण

by Manoj Bavdhankar
February 15, 2022
in Guhagar
16 0
0
Turmeric Cultivation Training in Abaloli

Turmeric Cultivation Training in Abaloli

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिन कारेकर यांनी उत्पादीत केला 3.5 किलो हळदीचा गड्डा 

गुहागर, ता.15 : आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात (Garwa Agri-Tourism Center) दि. 27 फेब्रृवारी 2022 रोजी एक दिवसाचे  प्रात्यक्षिकासह हळद लागवड प्रशिक्षण  घेण्यात येणार आहे. गेली 18- 20 वर्ष  हळद लागवड या विषयात काम करणारे. व  हळद  लागवडीचं रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतःचं असं ‘हळद लागवड तंत्रज्ञान’  विकसित  करणारे सचिन  कारेकर. यानी  तपश्चर्येतून *SK-4 (स्पेशल कोकण-4)* ही निवड पद्धतीने विकसित  केलेली हळदीची जात (वाण). आपल्या  शेतक-यांना देणारे तरूण संशोधक  शेतकरी सचिन  कारेकर यांनी यावर्षीसुद्धा हळद लागवडीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून सर्वाधिक 3.600 किलो वजनाचा गड्डा निर्माण केला आहे. Turmeric Cultivation Training in Abaloli

सचिन कारेकर यांनी हळद लागवडीचं तंत्रज्ञान विकसित तर केलंच पण रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः कोकणातील हवामानात  अधिक उत्पादन देणारी व किड-रोगास  सहसा बळी न पडणारी हळदीची SK-4 ( स्पेशल कोकण -4) ही जात विकसीत केली आहे. नुकताच  नॅशनल इन्नोव्हेशन फाऊंडेशन, इंडिया (गुजरात) च्या वरीष्ठ प्रकल्प सहकारी विपिन रातुरी यांनी कारेकर यांच्या हळद लागवडीच्या प्रक्षेत्राला भेट देवून कौतुक केले. Turmeric Cultivation Training in Abaloli

Turmeric Cultivation Training in Abaloli
Turmeric Cultivation Training in Abaloli

  *हळद लागवड प्रशिक्षण* 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हळद लागवडीबाबतची इत्तंभूत माहिती शेतक-यांना होण्यासाठी सचिन कारेकर यांनी आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात दि. 27 फेब्रृवारी 2022 रोजी एक दिवसाचे  प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण  लावण्यात आलेले आहे. शेतक-यांच्या व स्वतःच्या 20 वर्षातील अनुभवावर हे प्रशिक्षण असून हळद लागवडीपासून तर हळद काढणीपर्यंतचे मार्गदर्शन सचिन कारेकर हे करणार आहेत. तसेच  डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीने  विकसीत केलेले  हळकुंडापासून हळदीची रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिकास  मार्गदर्शन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर हे करणार  आहेत. यावेळी सेंद्रीय पद्धतीने हळद लागवडीबाबतसुद्धा कृषी विस्तार अधिकारी बी.बी.पाटील यांचे अनुभवही ऐकायला मिळणार आहे. Turmeric Cultivation Training in Abaloli

या प्रशिक्षणासाठी  नोंदणी करण्यात येत असून सचिन कारेकर 9422439794 , गजेंद्र पौनीकर 9420972402 या मोबाईल क्रमांकावर आगाऊ नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. Turmeric Cultivation Training in Abaloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTurmeric Cultivation Training in Abaloliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.