• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेदांत शिवणकर सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार

by Guhagar News
February 12, 2022
in Guhagar
16 0
0
Vedanta Shivankar Best Student Award

वेदांतला सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान करताना प्रा.जहूर बोट

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता 12 : प्रा. जहूर बोट यांच्या युनिटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर शृंगारतळी तर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचा इयत्ता नववीमधील विद्यार्थी वेदांत किरण शिवणकर याची सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.शालेय विविध स्पर्धा परीक्षांतील सहभाग व सुयश, गणित व विज्ञान विषयात केलेले उल्लेखनीय कार्य, इंस्पायर अवार्ड अंतर्गत विज्ञान प्रतिकृती (मॉडेल ) सादरीकरणासाठी दोनवेळा राज्यस्तरीय निवड, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुकास्तरीय गुणवत्ता यादी व रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये संपादन केलेले यश, दोनवेळा रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग व सुयश, सन २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षात बुद्धिबळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड, निती आयोग व कीडेक्सतर्फे राष्ट्रीयस्तरीय संपन्न झालेल्या ऑल राऊंडर चॅम्पियनशिप स्पर्धेत ३५० व्या रँकचे संपादन केलेले यश अशा विविध क्षेत्रातील यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (New English School and Junior College, Patpanhale) या विद्यालयाचा इयत्ता नववीमधील विद्यार्थी कु. वेदांत किरण शिवणकर याला युनिटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर शृंगारतळी तर्फे सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. Vedanta Shivankar Best Student Award

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या (New English School and Junior College, Patpanhale)श्री शिवछत्रपती सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रा. जहूर बोट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. हिरवे, गुहागर विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष श्री. घुटुकडे, विज्ञान शिक्षक मंडळाचे सदस्य व अडूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व्ही.आर. कोरडे, विज्ञान मंडळाचे सदस्य व कोतळूक हायस्कूलचे विज्ञान शिक्षक एच. व्ही.सुतार, गुहागर विज्ञान शिक्षक मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. Vedanta Shivankar Best Student Award

दरम्यान, यावेळी गुहागर विज्ञान शिक्षक मंडळातर्फे गुणवंत सन्मान सोहळाही संपन्न झाला. सन २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षातील गुहागर विज्ञान शिक्षक मंडळातर्फे अडूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व गुहागर विज्ञान शिक्षक मंडळाचे सदस्य श्री. विष्णू रामचंद्र कोरडे यांना विज्ञान मित्र पुरस्कार तसेच सन २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षाचा विज्ञान मित्र शिक्षक पुरस्कार कौतळूक हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. हणमंत विष्णू सुतार यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. Vedanta Shivankar Best Student Award

Tags: GuhagarGuhagar NewsJunior CollegeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNew English School and Junior College PatpanhaleNews in GuhagarVedanta Shivankar Best Student Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.