कोळवलीतील प्रकार : अंगणवाडीसेविकेच्या हुशारीमुळे गेल्या पळून
गुहागर, ता. 11 : आम्ही वरिष्ठ अधिकारी आहोत. आपल्या अंगणवाडीतील मुलांची आधारकार्ड क्रमांकांची माहिती द्या. असे सांगत अंगणवाडी सेविकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोळवलीत घडला. तेथील अंगणवाडीसेविकेने सरपंचाना फोन करते मग माहिती देते. असे सांगितल्यावर या महिला दूचाकीवरुन पळून गेल्या. Unknown women are asking for Aadhaar card


कोळवलीतील अंगणवाडी सेविका दिपिका सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला दुचाकीवरुन अंगणवाडीत दाखल झाल्या. आम्ही एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्पाच्या जिल्हास्तरावरील अधिकारी असल्याचे त्यांनी भासविले. कोळवली अंगणवाडीत किती मुले आहेत. याची चौकशी केली. त्यानंतर यासर्व मुलांच्या आधारकार्डची माहिती मागितली. ही माहिती कशाला हवी अशी विचारणा केली असता एका योजनेतून आर्थिक मागास मुलांना आर्थिक मदत करण्याची योजना असल्याचे त्या अज्ञात महिलांनी सांगितले. सुर्वे यांनी या महिलांकडे ओळखपत्रे मागीतली. त्यावेळी आम्ही अधिकारी आहोत. वरिष्ठांकडे ओळखपत्र मागण्याची पध्दत तुमच्याकडे आहे काय. असे विचारत त्या अज्ञात महिलांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या वर्तणुकीमुळे सुर्वे यांना संशय आला. मी सरपंचांना अंगणवाडीत बोलावते. त्यानंतर माहिती देते असे सांगून दिपिका सुर्वे फोन करण्यासाठी बाजुला गेल्या. ते पाहून या दोन्ही महिलांनी तेथून पळ काढला. Unknown women are asking for Aadhaar card
अंगणवाडी सेविका दिपीका सुर्वे यांनी हा सर्व प्रकार सरपंच व ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर दोन दिवसांनी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेची सभा तवसाळला झाली. या सभेमध्ये सुर्वे यांनी सर्वांना ही माहिती दिली. संघटनेच्या अध्यक्षा सारिका हळदणकर यांनी तेथूनच गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन सदर प्रकाराची माहिती दिली. त्यावर गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांकडून कोणतीही माहिती हवी असेल तर आपण सभेत बोलावून माहिती घेतो. तातडीने माहिती हवी असल्यास पर्यवेक्षकांद्वारे अंगणवाडी सेविकांना कळविण्यात येते. या व्यतिरिक्त कोणीही माहिती मागत असेल तर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी अशी माहिती देवू नये. Unknown women are asking for Aadhaar card
या संपुर्ण प्रकारामुळे अंगणवाडीसेविकांमध्ये या महिला कोण याची चर्चा सुरु आहे. या घटनेमध्ये कोणतीही तक्रार पोलीसठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही. मात्र तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी अनोळखी व्यक्ती माहिती मागण्यास आली तर त्यांच्या वाहनाचा क्रमांक, शक्य असेल तर फोटो अशी माहिती जमा करावी. त्यानंतर संघटना म्हणून आपण योग्य ती कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करु. असे आवाहन सारिका हळदणकर यांनी केले. Unknown women are asking for Aadhaar card