कै.सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे विज्ञानातील विविध संधींवर व्याख्यान संपन्न
गुहागर, ता 10 : दि. २९ जानेवारी,२०२२ रोजी मार्गताम्हाणे, ता. चिपळूण येथील कै.सौ.कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच येथे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) भूगर्भशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि भौतिकशास्त्र (Geology, Mathematics, Chemistry, Biology and Physics) या विषयातील “नोकरी तथा संशोधनाच्या विविध संधींवर” व्याख्यान आयोजित केले होते. खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल व्ही. सावंत यांनी दिलेल्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली आणि मार्गताम्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या (Margatamhane junior college) सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Lectures on various opportunities in science
सुरूवातीला सर्व विद्यार्थ्यासाठी प्रा.प्रमोद आगळे सर यांचे व्याख्यान “रसायन शास्त्रातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रा.संतोष जाधव सूक्ष्मजीवशास्त्र व मानवी सहजीवन, आजच्या कोरोनाच्या काळातील सुक्ष्मजीव शास्त्रज्ञांची भूमिका व गरज आणि या विषयातील विविध नोकरीच्या संधींवर प्रकाश टाकला. याशिवाय गणित, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्रातील (Mathematics, geology, physics) नवनवीन प्रयोग व त्यातील नोकरीच्या संधी या विषयावर प्रा.शीतल मालवणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .या कार्यक्रमासाठी अकरावी, बारावीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रताप सुर्वे सर, तसेच सुपरवाझर श्री भाऊ लकेश्री सर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Lectures on various opportunities in science