गुहागर, ता. 04 : शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे यांची तर सचिव पदी प्रथमेश दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या विश्र्वस्त मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. (Vyadeshwar Devsthan)

अनेकांचे कुलदैवत असलेल्या व्याडेश्र्वर देवस्थानने धार्मिक कार्यक्रमाचे गेल्या 15 वर्षात आरोग्य, कला, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रात विविध उपक्रम, सामाजिक कामे, मदत याद्वारे वेगळा ठसा उमटविला आहे. (Vyadeshwar Devsthan)

या देवस्थानच्या विश्र्वस्त मंडळाची गुरुवारी (3 फेब्रुवारी) बैठक झाली. या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांनंतरचे विश्र्वस्त मंडळ पुढील प्रमाणे. अध्यक्ष शादुर्ल भावे, सचिव प्रथमेश दामले, खजिनदार सर्वेश भावे, विश्र्वस्त : प्रकाश भावे, संदिप बारटक्के, विनायक जाधव, गजानन मोरे, श्रीधर आठवले, मनिष कामरेकर, सचिन मुसळे, केदार खरे, हेमंत बारटक्के, अभिजीत भिडे, मयुरेश आठवले. या नियुक्त्यांनंतर गुहागर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी नव्या विश्र्वस्तांचे अभिनंदन केले आहे. (Vyadeshwar Devsthan)
