प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्र संचालनालयाचा संघ सर्वोत्तम
मुंबई ता. 2 : Maharashtra NCC wins PM flag राष्ट्रीय छात्र सेनेच्या (National Cadet Corps) महाराष्ट्र संचालनालयाच्या 57 जवानांच्या तुकडीने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये (Republic Day 2022 celebrations) पंतप्रधान सन्मान प्राप्त केला आहे. अनेक चषके आणि पदके जिंकण्यासोबतच सर्व आघाड्यांवर ही तुकडी सर्वोत्तम ठरली आहे. महाराष्ट्र संचालनालयाने सात वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सर्वोत्तम संचालनालयाचा चषक जिंकला आहे. (Maharashtra Won the Best Directorate Cup)

Maharashtra NCC wins PM flag
2022 च्या प्रजासत्ताक सोहळ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या 57 जवानांच्या तुकडीमधील 17 जवानांनी अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी राजपथावरील संचलनात भाग घेतला. तर पंतप्रधानांच्या सन्मानार्थ झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेच्या गार्ड ऑफ ऑनर रॅली (Guard of Honor Rally) मध्ये 7 जवान सहभागी झाले होते. Maharashtra NCC wins PM flag

पंतप्रधानांच्या रॅलीदरम्यान सिनियर अंडर ऑफिसर गीतेश दिनगर यांना गार्ड कमांडर म्हणून प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वजाला सलाम करण्याचा सन्मान (Honor to salute the PM flag) मिळाला. कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील यांची हवाई विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट कॅडेट (All India Best NCC Cadet) म्हणून निवड झाली. महाराष्ट्रातील 5 कॅडेटना राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालक प्रशंसा पत्रे (Director General’s Letters of Appreciation) देऊन गौरविण्यात आले. Maharashtra NCC wins PM flag

राज्यात 1 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या सन्मान समारंभात (Honor Ceremony) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनच्या संचलन शिबिरादरम्यान अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट जवानांचा आणि पारितोषिक विजेत्यांचा पारितोषिके देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले. छात्र सेनेच्या जवानांशी संवाद साधला. Maharashtra NCC wins PM flag

या सन्मान समारंभाला राज्यमंत्री सुनील केदार (Minister of State Sunil Kedar), यशोमती ठाकूर (Minister of State Yashomati Thakur) आणि अदिती तटकरे (Minister of State Aditi Tatkare), राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी, संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रुप कमांडर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग देखील उपस्थित होता. Maharashtra NCC wins PM flag
आजच्या बातम्या आपण वाचल्यात का ?
गुहागरचा विद्यमान जमीन वापर नकाशा
रस्त्याला संरक्षक कठडा नसल्याने अपघात
पोस्टाने एटीएम सुविधा सुरु करावी