• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 November 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा

by Mayuresh Patnakar
November 28, 2026
in Guhagar
16 1
0
Automatic rain gauge system at Velneshwar College
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

IITM पुणेच्या ‘मिशन मौसम’ अंतर्गत स्थापना; पश्चिम घाटातील पावसाची नोंद होणार, विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी

गुहागर, ता. 28 : व्ही.पी.एम. महार्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांच्या माध्यमातून स्वयंचलित पर्जन्यमापक (Automatic Rain Gauge) यंत्रणेची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘मिशन मौसम’ उपक्रमांतर्गत पश्चिम घाट परिसरात उभारण्यात येत असलेल्या हवामान निरीक्षण नेटवर्कचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. Automatic rain gauge system at Velneshwar College

पश्चिम घाटातील पावसाचे अचूक व रिअल-टाइम निरीक्षण करणे, हवामानाचा अभ्यास, जलविज्ञान संशोधन आणि हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. या केंद्रातून संकलित होणारी पावसाची माहिती IITM च्या हाय-डेन्सिटी मेटेरिऑलॉजिकल ऑब्झर्वेशन नेटवर्कशी जोडली जाणार आहे. Automatic rain gauge system at Velneshwar College

या यंत्रणेच्या स्थापनेमुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील हवामान निरीक्षण व संशोधन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हवामान निरीक्षण यंत्रणेचा अभ्यास करता येणार असून, रिअल-टाइम पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर आधारित प्रकल्प व संशोधन करता येणार आहे. हवामानशास्त्र, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डेटा ॲनालिसिस आणि पर्यावरण अभियांत्रिकी या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यासही मदत होणार आहे. Automatic rain gauge system at Velneshwar College

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. हृषिकेश गोखले यांच्या विशेष प्रयत्नातून ही स्थापना पूर्ण झाली. यासाठी IITM महाबळेश्वर येथील सायंटिस्ट सी श्री. सचिन पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन सहकार्य केले. या यंत्रणेमुळे वेळणेश्वर येथील महाविद्यालय राष्ट्रीय हवामान निरीक्षण नेटवर्कशी जोडले गेले असून, परिसरातील हवामानविषयक संशोधनाला आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा मिळणार आहे. Automatic rain gauge system at Velneshwar College

Tags: Automatic rain gauge system at Velneshwar CollegeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.