इयत्ता १० वी व १२ वी च्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळण्याबाबत
गुहागर, ता. 27 : शिवसेना गटनेता व पंचायत समिती सदस्य गौरव सुशिल वेल्हाळ यांनी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांना निवेदन दिले आहे. Gaurav Velhal’s statement to the Speaker
त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या प्रशासकीय स्तरावर जनगणनेच्या कामकाजाचे नियोजन सुरु असून त्यासाठी गुहागर तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी व मार्च २०२७ या महिन्यांमध्ये होणार आहेत. तत्पूर्वी, जानेवारी २०२७ मध्ये विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा (Oral) व प्रात्यक्षिक परीक्षा (Practical) आयोजित केल्या जातात. या परीक्षांचे नियोजन, तयारी आणि प्रत्यक्ष कामकाज पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी इयत्ता १० वी व १२ वी ला शिकवणाऱ्या संबंधित विषय शिक्षकांवर असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्याने या काळात संबंधित शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केल्यास विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीवर आणि शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. Gaurav Velhal’s statement to the Speaker
तरी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता गुहागर तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळण्यात यावे आणि त्यांच्या ऐवजी इतर वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती गौरव सुशील वेल्हाळ यांनी केली आहे. Gaurav Velhal’s statement to the Speaker
