ऋग्वेदी आरवलकर, दीक्षा भोसले यांचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
गुहागर, ता. 26 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आदर्श विद्यालय, देवघर येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर, जामसुतच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. Jamasut students succeed in oratory competition
या स्पर्धेतील पाचवी ते सातवी गटात कु. ऋग्वेदी संतोष आरवलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर आठवी ते दहावी गटात कु. दीक्षा दीपक भोसले हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. दोलतडे सर यांचे सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संतोष साळवी व सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर साळवी व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. Jamasut students succeed in oratory competition
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. डाकवे मॅडम, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. कदम सर, श्री. लाड सर, श्री. माणगावकर सर, सौ. आरवलकर मॅडम, श्री. वाजे सर, पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Jamasut students succeed in oratory competition
