• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची मोठी गर्दी

by Ganesh Dhanawade
November 16, 2026
in Guhagar
32 0
0
Rush of tourists for ferryboat service
63
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : दाभोळ खाडीवरील सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. च्या दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांचा वेळ, पैशांची बचत होत आहेच, तसेच निसर्गाचा आनंदहि या फेरीबोट सेवेमुळे घेता येत आहे. Rush of tourists for ferryboat service

कोकणचा पर्यटनातून विकास करण्यासाठी सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे दाभोळ – धोपावे, जयगड – तवसाळ, वेश्वी – बाग मांडले, परचुरी – फरारे याठिकाणी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवेमुळे कोकणातील सर्व पर्यटन स्थळे जवळ आली आहेत. तसेच वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे बहुतांशी पर्यटक या फेरीबोट सेवेचा लाभ घेऊन प्रवास करताना दिसतात. Rush of tourists for ferryboat service

समुद्र किनाऱ्यांचा विकास आणि जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून वसई खाडीमध्ये वसई – भाईंदर अशी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे रस्तेमार्गे सुमारे दीड तासांचा लागणारा प्रवासाचा वेळ १५ मिनिटांवर आला आहे. पूर्वी दापोलीत जाण्यासाठी गुहागर मध्ये आलेल्या पर्यटकांना चिपळूण करून खेड मार्गे दोन ते अडीच तासांचा प्रवास करून जावे लागतं होते. आता 10 ते 15 मिनिटांचे फेरीबोटीचे अंतर पार करून अर्ध्या तासात दापोलीत पोचता येत आहे. हे सर्व सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व कार्यकारी व्यवस्थापक डॉ. योगेश मोकल यांच्या या फेरीबोट सेवेमुळे शक्य झाले आहे. एकाच वेळी 100 प्रवासी आणि मोठी वाहने वाहून नेण्याची क्षमता असल्याने दिवाळीच्या सुट्टीत आलेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच लागल्या आहेत.  Rush of tourists for ferryboat service

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRush of tourists for ferryboat serviceटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.