गुहागर, ता. 16 : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आपल्या महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर यांच्या वतीने गुहागर समुद्रकिनारा व पोलीस परेड ग्राउंड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्र येत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक, कचरा, बाटल्या व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ केला. समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता राखावी, असे आवाहन देखील यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले. Beach cleaning campaign

समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य जपणे, सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सामाजिक उपक्रमातून महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ गुहागर या संस्थेने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. तसेच भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प या मंडळाच्या वतीनं करण्यात आला. Beach cleaning campaign
या स्वच्छता मोहिमेत गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे गुहागर तालुकाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव महेश जामसुतकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे शामकांत खातू व अरुण मालप सहभागी झाले होते.तसेच महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागरचे बाबू गुहागरकर, प्रविण रहाटे, कल्पेश बागकर, स्वप्नील राऊत, राहुल जाधव, विलास वाघधरे, रविंद्र बागकर, शुभम भायनाक, कुणाल देसाई, राकेश राऊत, आशिष विचारे, प्रथमेश कदम, प्रसाद बोले, विनायक बारटक्के, केदार मालप, विरेंद्र साळवी, युवराज शिर्के, संगम मोरे, भावेश रोहिलकर, अभिजित गोळे, तेजस कदम व नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. Beach cleaning campaign

स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर पर्यावरण आणि निरोगी समाज असा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला. आज आपली सामाजिक जबाबदारी बजावत महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ गुहागर यांच्या वतीने गुहागर समुद्र किनारी आणि पोलीस परेड ग्राउंड येथे सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या मंडळाच्या सर्व सदस्यांचे व सर्व मान्यवरांचे मंडळाकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यात मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमातही असाच आपला सर्वांचा सहभाग राहील आणि आपला कार्यक्रम यशस्वी होईल. ही सदिच्छा मंडळाकडून व्यक्त करण्यात आली. Beach cleaning campaign
