• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 November 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगारासाठी नवीन चार जिजाऊ बस दाखल

by Mayuresh Patnakar
November 7, 2026
in Guhagar
43 0
0
New Jijau bus for Guhagar depot
84
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालकमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार

गुहागर, ता. 07 : गुहागर आगाराच्या ताफ्यात नवीन चार जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि प्रवासी सेवेत अधिक सुधारणा करण्यासाठी या नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बस दाखल झाल्याने गुहागर आगाराची सेवा क्षमता वाढणार आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी जिजाऊ बस ही महत्त्वाची सेवा आहे. या चार नवीन बस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. New Jijau bus for Guhagar depot

गुहागर तालुका शिवसेना तसेच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सर्व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर या सर्वांच्या मागणीवरून चार जिजाऊ बस गुहागर आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. गुहागर आगारासाठी या बस उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदयजी सामंत यांचे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या बस मिळाल्या असून आगाराच्या वतीने आणि प्रवाशांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. New Jijau bus for Guhagar depot

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNew Jijau bus for Guhagar depotNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet21
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.