• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 November 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आमसभेत ब्रह्माकुमारी सीमा बहेनजी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

by Mayuresh Patnakar
November 5, 2026
in Guhagar
61 1
0
Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly
121
SHARES
345
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : गुहागर येथे दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. मा. आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार तसेच परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

या सभेमध्ये गटविकास अधिकारी (BDO), तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, डेपो मॅनेजर, नगरपालिका मुख्याधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सभापती आदी मान्यवर सहभागी झाले होते. गुहागर व परिसरातील सुमारे ७०० ते ८०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सभेस गुहागर सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय ब्रह्माकुमारी सीमा बहेनजी यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आले होते. Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

यावेळी ब्रह्माकुमारी सीमा बहेनजी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या विविध प्रभागांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. यामध्ये ग्रामविकास प्रभागाच्या वतीने प्रोत्साहन दिल्या जाणाऱ्या योगिक शेतीविषयी तसेच मेडिकल विंगच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती अभियानाविषयी त्यांनी उपस्थितांना अवगत केले. तसेच राजयोग ध्यानाच्या माध्यमातून जनमानसाचे मानसिक सशक्तीकरण, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनशैली विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे विशद केले. “दररोज स्वतःसाठी केवळ १५ मिनिटे द्या आणि राजयोग ध्यानाचा नियमित अभ्यास करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

Guidance from Seema Behenji at Guhagar General Assembly

Tags: GuhagarGuhagar NewsGuidance from Seema Behenji at Guhagar General AssemblyLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.