रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघातर्फे २० नोव्हेंबरपर्यंत लेख पाठविण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पद्मभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खुली लेखस्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली आहे. साहित्यप्रेमी, विद्यार्थी, वाचक, लेखक तसेच सर्व नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. Dr. Dhananjay Keer Article Competition
या स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले असून, स्पर्धकांनी त्यापैकी कोणत्याही एका विषयावर १००० ते १२०० शब्दांचा लेख लिहायचा आहे. यामध्ये ‘महाराष्ट्रातील सुका दुष्काळ आणि माझी जबाबदारी’, ‘ग्रंथसंपदा आणि मानवी जीवन – सहसंबंध’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व वैश्विक बुद्धिमत्ता यांमधील सुसंवाद’ या विषयांचा समावेश आहे. Dr. Dhananjay Keer Article Competition
स्पर्धकांना लेख हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात पाठविता येईल. लेख कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेला असावा. लेखावर स्पर्धकाचे नाव किंवा ओळख नमूद करू नये. नाव, पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र कागदावर जोडणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२६ आहे. Dr. Dhananjay Keer Article Competition
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्तम लेखांसाठी उत्तेजनार्थ पुरस्काराचाही विचार केला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या लेखांचे ‘कुसुमधन’ या वार्षिक अंकात प्रकाशन करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण वार्षिक अधिवेशनात होणार आहे. Dr. Dhananjay Keer Article Competition
स्पर्धकांनी आपले लेख स्व. सौ. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, नाचणे, ‘सौमित्र’, जिल्हा परिषद शाळा नाचणे क्र. १ जवळ, सौभाग्य नगर, साळवी स्टॉप, रत्नागिरी – ४१५६३९ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 7620458320 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी या लेखस्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार लेखनातून व्यक्त करावेत, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. महेंद्र रामचंद्र दळवी यांनी केले आहे. Dr. Dhananjay Keer Article Competition