• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चोरवणे ग्रामस्थांनी बांधला 20 मिटरचा बंधारा

by Mayuresh Patnakar
October 30, 2026
in Ratnagiri
43 0
0
Villagers built a 20-meter check dam
84
SHARES
239
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई ग्रामस्थांसह नाम फाऊंडेशन व अनुलोमचे सहकार्य

गुहागर, ता. 30 : चोरवणे (ता. खेड) गावातील ग्रामस्थ, मुंबई मंडळ, नाम फाउंडेशन आणि अनुलोम यांच्या सहकार्यातून टेपवणे नदीवर 21 मिटर लांबीचा व 5 उंचीचा विजय बंधारा बांधण्यात आला. तसेच नदीपात्रातील दगड काढून 2 ते 5 फुट खोलीकरण करण्यात आले. यामुळे नदीपात्रात नळ पाणी योजनेच्या विहीरीजवळ मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे.  Villagers built a 20-meter check dam

खेड तालुक्यातील चोरवणे हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. याच गावातील डोंगराच्या माथ्यावर श्री क्षेत्र नागेश्र्वराचे स्थान आहे. गावातून वहाणारी टेपवणे नदी एकेकाळी बारमाही नदी म्हणून ओळखली जायची. मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधुन कोसळणाऱ्या दरडींमुळे चोरवणे परिसरातील नदीत दगडगोट्यांचा लांबलचक 3 ते 4 फुटाचा थर निर्माण झाला. नदीपात्राची रुंदी कमी झाली. आणि दिवाळीनंतर नदीपात्र कोरडेठाक पडु लागले. यावर्षी पाऊस कमी झाल्याने दिवाळीपूर्वीच नदीपात्रातील प्रवाह क्षीण झाला होता. या नदीवर चोरवणे निवे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने पुढील दोन महिन्यातच गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे गावकऱ्यांनी विहीरीच्या परिसरात विजय बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु बंधारा बांधण्यात अडसर होता. दगड गोट्यांचा. नदीपात्रात गाळाची जाग दगडगोट्यांनी घेतलेली असल्याने केवळ श्रमदानाने हे काम पूर्ण होणारे नव्हते. Villagers built a 20-meter check dam

त्यामुळे नाम फाउंडेशनची मदत घेण्याचे ठरले. अनुलोमचे भाग जनसेवक ज्ञानेश्र्वर शिंदे यांच्या माध्यमातून नाम फाउंडेशनच्या प्रथमेश पोमेंडकर यांच्याकडे विषय गेला. चोरवणे निवे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रविण जाधव यांनी पुढाकार घेत मागणी पत्रक दिले. दोन ट्रॅक्टर, दोन जेसीबी यांची व्यवस्था नाम फाउंडेशनने केली. तर त्याच्या भाड्यापोटी द्याव्या लागणाऱ्या रक्कमेची उभारणी करण्यासाठी उपसरपंच प्रविण सावंत यांनी गावकऱ्यांना साद घातली. प्रत्येकाच्या योगदानातून रक्कम तयार झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. गावकरी, मुंबईकर ग्रामस्थ, अनुलोमचे कार्यकर्ते, चोरवणे विद्यालयातील मुले सर्वजण टेपवणे नदीच्या तिरावर आले. देवदेवतांचे आशिर्वाद या कामाला मिळावेत म्हणून नारळ वाढविण्यात आले. त्यानंतर सर्वांनी नदीपात्रातील दगड बंधारा उभा करायच्या ठिकाणी टाकले. प्रतिकात्मक श्रमदानानंतर 2 जेसीबी आणि 2 ट्रक्टरच्या साह्याने 70 फुट लांब व 10 फुट रुंदीचा दगडी बांध तयार करण्यात आला. त्या बांधावर दोन्ही बाजुने माती टाकून प्लास्टीकचा कागद अंथरण्यात आला. तीन दिवस हे काम सुरु होते. हा बंधारा बांधुन झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पाण्याची पातळी 5 ते 6 फुटाने वाढली आहे. Villagers built a 20-meter check dam

या कामामुळे चोरवणे ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाण्याच प्रश्र्न सध्या तरी सुटला आहे. त्याबाबत ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. या बंधाऱ्यांच्या कामामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार उपसरपंच प्रविण सावंत यांनी मानले. Villagers built a 20-meter check dam

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVillagers built a 20-meter check damटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet21
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.