• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीवर धडकले!

by Guhagar News
October 28, 2026
in Bharat
76 0
0
Cyclone ‘Arnab’
148
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पहाटे १.२० च्या सुमारास किनारपट्टीवर धडकले. वादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर होता, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. त्याचा थेट प्रभाव आता महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. Cyclone ‘Arnab’

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज २८ ऑक्टोबर रोजी वादळाच्या बाह्य पट्ट्यांमुळे संपूर्ण विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २८ ऑक्टोबर रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Cyclone ‘Arnab’

२९ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. पाऊस सुरू असताना ताशी ४० ते ५० किमी वेगाने, तर काही वेळेस ६० किमी प्रतितास झंझावाती वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone ‘Arnab’

२८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. Cyclone ‘Arnab’

Tags: Cyclone ‘Arnab’GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.