• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेच्या दणक्याने रखडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर!

by Mayuresh Patnakar
October 27, 2026
in Guhagar
44 0
0
MNS's statement to Guhagar Nagar Panchayat
86
SHARES
247
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसेचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन;  वर्षभरापासून पाइपलाइन तयार मात्र पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा

गुहागर, ता. 27 : कीर्तनवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर (ठोंबरे विभाग) ते प्रवीण साटले यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली नवीन पाइपलाइन गेल्या जवळपास वर्षभरापासून सुरू न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat

पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होऊन जवळपास वर्ष उलटले, तरी अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काम पूर्ण होऊनही नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याने या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संबंधित पाइपलाइनची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि पाणीपुरवठा कोणताही विलंब न करता सुरू करावा, अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. तसेच, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयात त्वरित हस्तक्षेप करावा, असेही निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.  MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर आणि गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर उपस्थित होते. आता या निवेदनाची नगरपंचायत प्रशासन कितपत दखल घेते आणि कीर्तनवाडीतील नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNS's statement to Guhagar Nagar PanchayatNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.