उल्हास नवभारत साक्षरता अभियान; सर्व नऊ परीक्षा केंद्रांचा निकाल शंभर टक्के
गुहागर, ता. 26 : केंद्र शासनाच्या उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत 25 ऑक्टोबर 2026 रोजी नव साक्षरांची परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये शंभर टक्के नव साक्षर परीक्षेला प्रविष्ट झाले होते व गुहागर केंद्रातील सर्व शाळांमध्ये गुहागर नंबर 1, गुहागर नंबर 2, गुहागर उर्दू, असगोली नंबर 1, असगोली नंबर 2, आरे देव रहाटी, आरे भंडारवाडा, श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर, अन्नपूर्णा विद्यालय या सर्व शाळांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. Examination for newly literate individuals in Guhagar

नव साक्षर आणि स्वयंसेवकाने घेतलेल्या मेहनतीला यश आले असून आजचा दिवस हा जीवनातील संस्मरणीय असल्याचे नव साक्षरानी सांगितले. गुहागर केंद्रात एकूण नऊ परीक्षा केंद्रे घोषित करण्यात आली होती. गुहागर नंबर एक, गुहागर हायस्कूल आरे, देवरहाटी या शाळांना केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना )आदरणीय श्री लोहार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये नियोजनबद्ध रीतीने नवसाक्षरांच्या परीक्षा संपन्न झाल्या. Examination for newly literate individuals in Guhagar
