• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पांगारी रस्ता अडविल्याप्रकरणी तातडीने कारवाई करा

by Mayuresh Patnakar
October 26, 2026
in Old News
66 1
0
130
SHARES
370
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पंचायत समिती सभेत उपसभापती सुर्वे यांच्या सूचना

गुहागर, ता. 26 : जो रस्ता गेली २५ वर्षे वाहतुकीसाठी सुरू आहे, ज्या रस्त्यावर शासकीय निधी खर्च पडला आहे, तो पांगारी-सडेवाडी रस्ता तेथील लोकप्रतिनिधीच अडवल्याने शुक्रवारी येथे झालेल्या पंचायत समिती सभेत उपसभापती नीलेश सुर्वे यांनी आक्रमक भूमिका घेतली. Take action for the obstruction of the road

ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असूनही गेले चार महिने कारवाई करण्यात येत नसल्याने त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत संबंधितांवर तातडीने कारवाई करत रस्ता सुरू करण्याच्या सूचना दिल्या. गुहागर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित सभेत तालुक्यात सर्वाधिक वनराई बंधारे बांधणाऱ्या ग्रामपंचायतींचा तसेच राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल खामशेत ग्रामपंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. पांगारी-सडेवाडी रस्त्याच्या प्रश्नावर उपसभापती आक्रमक झाले. गेले चार महिने कायदेशीर कारवाई करतो असे प्रशासन आम्हाला सांगत आहे. मात्र दरवेळी ग्रामस्थ रस्त्याबाबतच्या तक्रारी आमच्यासमोर मांडत असून जे चुकीचे आहे त्याच्यावर कारवाई करण्यास विलंब का? असा प्रश्न जि.प. बांधकाम उपअभियंत्यांना विचारून संबंधित लोकप्रतिनिधीवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी सूचना दिली. Take action for the obstruction of the road

यावेळी भूमीगत केबलचा विषय चांगलाच गाजला. गटारामध्ये टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल व त्यावर बसवण्यात येणारे डीपी तातडीने काढून टाकावे अशा सूचना करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ठेकेदार एकीकडे डीपी काढणार आहोत असे सांगत आहे व दुसरीकडे डीपीची जोडणी करत असेल तर हे तेथील जनतेसाठी धोकादायक आहे. ठेकेदाराच्या भूमिगत केबलच्या चुकीच्या कामामुळे आज मृत्यूचे जाळे तयार झाले आहेत. यामुळे तातडीने गटार सोडून भूमिगत केबल टाकण्यात यावी, असे सभागृहातून महावितरणला सांगण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सुनील सूद यांनी माहिती देताना भूमिगत केबल लाईनचे काम लवकर संपवायचे असल्याने तालुक्यातील १५ ते २० विद्युत रोहित्रे रद्द करण्यात आली असल्याचीही माहिती दिली. Take action for the obstruction of the road

जिल्हा परिषद रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना जिल्हापरिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम यांना बरोबर घेऊन ज्या रस्त्यांची खोदाई झाली आहे. त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सामूहिक पाहणी करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या. पावसाळा थांबल्याने रस्ता सुस्थितीत करण्यासाठी तातडीने कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले. रानवी फाटा ते पांगरी दरम्यानचा रस्ता पुन्हा उखडल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी सूचनाही करण्यात आली. सामाजिक वनीकरणातर्फे झोंबडी येथे २५ हजार रोपांची रोपवाटिका सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी खैर रोपेही तयार करावीत असे सूचवण्यात आले. तालुक्यातील पांगरी व वेळंब येथील ज्या अंगणवाड्यांचे काम पूर्ण झाले आहे अशा अंगणवाड्यांचे तातडीने उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या. Take action for the obstruction of the road

तालुक्यातील जलजीवनची कामे चांगली व वेळेत व्हावीत याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. चुकीचे काम होत असेल त्यावर तातडीने कार्यवाही करावी. ठेकेदार कोणी असो, चुकीच्या कामांवर व दिरंगाईवर तातडीने कारवाई करावी अशी सूचना करण्यात आली. गुहागरसाठी मिळाले ५९ शिक्षक तालुक्यात शिक्षकांची कमतरता पाहता ज्या शिक्षकांची बदली झाली आहे त्या शिक्षकांना नवीन शिक्षक येईपर्यंत सोडण्यात येऊ नये असा पवित्रा सभापती यांनी घेतला होता. यामुळे आज गुहागरसाठी ५९ शिक्षक मिळाले असून गणित व विज्ञानसाठी २३ पदवीधर, ३४ उपशिक्षक तर २ उर्दू शिक्षक मिळाले आहेत. पाणीटंचाईग्रस्त आराखडा तीन टप्प्यात यावर्षी पाणीटंचाईग्रस्त आराखडा तीन टप्यात तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तीन टप्पे करण्यात आले असून पहिल्या तीन महिन्यांसाठी चार गावे टंचाईग्रस्तमध्ये घेण्यात आली आहेत. तसेच एप्रिल ते जून या कालावधीसाठी काही ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली. ग्रामपंचायतींनी १४ व १५व्या वित्त आयोगमधील निधी तातडीने खर्ची पाडावा यासाठी विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना योग्य सूचना द्याव्यात तसेच कुडली गावात तब्बल आठ लाख रुपये पाणीपट्टी थकित असून त्याची तातडीने वसुली करावी, असे निर्देश देण्यात आले. Take action for the obstruction of the road

यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, प्रभारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम, पंचायत समिती सदस्य, अधिकारी उपस्थित होते. Take action for the obstruction of the road

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTake action for the obstruction of the roadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.