• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएल, कोकण एलएनजीतील कामगारांची पडताळणी करा!

by Mayuresh Patnakar
October 23, 2026
in Guhagar
44 0
0
Verification of workers at RGPPL, Konkan LNG
86
SHARES
245
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात नोंदणीची मनसेची मागणी

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी लिमिटेड कंपनीमध्ये विविध कामांसाठी परराज्यातील कामगारांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कामगारांची माहिती स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवून आवश्यक ओळख पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. Verification of workers at RGPPL, Konkan LNG

आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी हे महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प असल्याने येथे काम करणार्‍या कामगारांची अधिकृत माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. कामगारांचे पूर्ण नाव, मूळ गाव, कायमस्वरूपी पत्ता, सध्याचे वास्तव्य, संपर्क क्रमांक आणि त्यांना कामावर घेणार्‍या ठेकेदाराची माहिती नोंदवावी, अशी भूमिका जानवळकर यांनी मांडली. कंपनीत कामगार पुरविणार्‍या ठेकेदारांनी अद्ययावत कामगार यादी ठेवावी. कामगार कामावर रुजू होताना किंवा काम सोडताना नोंदी अद्ययावत कराव्यात. तसेच अधिकृत ओळखपत्र, प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा तपासणी याबाबत काटेकोर व्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Verification of workers at RGPPL, Konkan LNG

स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांनी समन्वयाने कामगार नोंदणी व ओळख पडताळणीची कायद्यानुसार कार्यपद्धती निश्चित करावी. रोजगारासाठी येणार्‍या कामगारांकडे संशयाने न पाहता, सर्वांसाठी नियमानुसार पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जानवळकर यांनी स्पष्ट केले. औद्योगिक विकासासोबत स्थानिक नागरिकांची सुरक्षितता, सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. Verification of workers at RGPPL, Konkan LNG

Tags: GuhagarGuhagar NewsKonkan LNGLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVerification of workers at RGPPLटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.