अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान
गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘आदर्श सरपंच सन्मान सोहळा २०२६’ मध्ये गुहागर तालुक्यातील आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. Glory to Sarpanch Vaishnavi Netke
आबलोली गावाच्या विकासासाठी केलेले कार्य, ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. Glory to Sarpanch Vaishnavi Netke

या सोहळ्याला सरपंच संघटनेचे अध्यक्ष व मार्गदर्शक बाबासाहेब पावसेपाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, विश्वस्त सुजाता कासार, संघटक रवींद्र पवार, राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे, कार्याध्यक्ष रवींद्र पावसे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. Glory to Sarpanch Vaishnavi Netke
सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांच्या विश्वासाला यापुढेही पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्यांचे सांगितले. “हा सन्मान माझा नसून आबलोली गावातील प्रत्येक ग्रामस्थांचा आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. Glory to Sarpanch Vaishnavi Netke
