• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

by Mayuresh Patnakar
October 23, 2026
in Guhagar
33 1
0
Eye Check-up Camp at Asgoli
65
SHARES
187
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व एनवायएबी हॉस्पिटलचा उपक्रम

गुहागर, ता. 23 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि एनवायएबी हॉस्पिटल, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी असगोली येथील लायन डॉ. शैलेश कनगुटकर यांच्या श्री होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ५० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले असून, या शस्त्रक्रिया लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत. Eye Check-up Camp at Asgoli

Eye Check-up Camp at Asgoli

गरजू रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे नेत्रोपचारापासून वंचित राहावे लागू नये, या सामाजिक बांधिलकीतून शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमासाठी एनवायएबी हॉस्पिटलचे विकास अधिकारी संदीप नलावडे, सहायक रूपेश गुरव, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले. Eye Check-up Camp at Asgoli

Eye Check-up Camp at Asgoli

यावेळी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष लायन मनीष खरे, खजिनदार लायन निखिल तांबट, चार्टर प्रेसिडेंट लायन श्यामकांत खातू, माजी अध्यक्ष लायन अनिकेत गोळे, उपाध्यक्ष लायन माधव ओक, लायन राहुल शिंदे, लायन शैलेन्द्र खातू आणि शिबिराचे यजमान लायन डॉ. शैलेश कनगुटकर उपस्थित होते. गुहागरचे नेत्रतज्ज्ञ डॉ. दिनेश जोशी यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. Eye Check-up Camp at Asgoli

Eye Check-up Camp at Asgoli

Tags: Eye Check-up Camp at AsgoliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.