• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पांगारी क्र.१ तर्फे वेळंब शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात

by Mayuresh Patnakar
October 21, 2026
in Guhagar
26 1
0
Pangari School's Amrit Mahotsav ceremony
52
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

७५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास; माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना मदत

गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र. १ तर्फे वेळंब या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन अर्थात अमृत महोत्सव कार्यक्रम सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करत शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. Pangari School’s Amrit Mahotsav ceremony

शाळेची स्थापना ११ ऑक्टोबर १९५१ रोजी झाली होती. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्ग यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणतज्ज्ञ शूरसेन जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक विश्वास बेलवलकर, कोतळूक केंद्राचे केंद्रप्रमुख खरडे, तालुका समन्वयक विजय माने, माजी विद्यार्थी व माजी सरपंच खांबे, माजी विद्यार्थी गिजे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजस्वी जाधव, समिती सदस्य, पालक, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Pangari School’s Amrit Mahotsav ceremony

Pangari School's Amrit Mahotsav ceremony

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. विश्वास बेलवलकर आणि खरडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Pangari School’s Amrit Mahotsav ceremony

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापून टाळ्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विश्वास बेलवलकर यांनी विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये, तर खांबे यांनी ५०० रुपये आर्थिक मदत दिली. माजी विद्यार्थी गिजे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. Pangari School’s Amrit Mahotsav ceremony

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सासणे सर आणि सहशिक्षिका मेहेत्रे मॅडम यांनी केले. अल्पोपाहार व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनामुळे शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि माजी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. Pangari School’s Amrit Mahotsav ceremony

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsNews in GuhagarPangari School's Amrit Mahotsav ceremonyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.