शाळा आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुहागर, ता. 20 : पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी वेळणेश्वर येथे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ एकवटले. वेळणेश्वर-वाडदई ग्रुप ग्रामपंचायत, पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ आणि न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर यांच्या संयुक्त पुढाकारातून मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी या उपक्रमांतर्गत वेळणेश्वर खालची गोणबरेवाडी व आगरवाडीतील नदीवर तीन वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जलसंधारणाचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. Students join hands for water conservation
यंदा पावसाने लवकर माघार घेतल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी शेतीवरही परिणाम होण्याची भीती असून, भूजलपातळी खालावण्याची चिंता व्यक्त होत आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद आणि गुहागर पंचायत समितीच्या वतीने ‘मिशन बंधारे’ मोहिमेला गती देण्यात येत आहे. या मोहिमेला शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Students join hands for water conservation
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत जिरविणे, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच श्रमदान, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये रुजण्यास मदत होत असल्याची माहिती पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेचे नोडल टीचर बाबासाहेब राशिनकर यांनी त्यावेळी दिली. Students join hands for water conservation
या उपक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर-वावरे, शिक्षण सेविका प्रियंका पवार, अंजूम शेख तेजस्विनी जगताप शिक्षणसेवक अतुल वसावे यांनी तर न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वरचे मुख्याध्यापक सुर्यकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक मांजरे, सचिन चिले निलेश उतेकर सचिनद पाटील आकांक्षा खरे रिद्धी वळंजू यांनी सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदई प्रशासक ज्ञानेश्वर वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी गणेश क्षीरसागर, कर्मचारी अशिष गुरव, संकेत ठाकूर, संजोग ठाकूर, स्वच्छता कर्मचारी अनिल जाधव, आशा सेविका साक्षी कलमकर, शाश्वती पालशेतकर, मयुरी पेडणेकर, वेळणेश्वर ग्रामस्थ बंधु भगिनीं यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. Students join hands for water conservation
