कवी राजेंद्र आरेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; ग्रंथप्रदर्शनासह वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता. 16 : मधील श्री देव गो कृ माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात व विविध उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे कवी श्री राजेंद्र आरेकर, माजी मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे, मुख्याध्यापिका सौ एस एस कांबळे मॅडम, पर्यवेक्षिका सौ जी एस कनगुटकर मॅडम , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून उपस्थित प्रमुख पाहुणे कवी साहित्यिक श्री राजेंद्र आरेकर यांचे स्वागत व सन्मान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एस कांबळे मॅडम यांनी शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला. तसेच माजी मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर यांचे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन पर्यवेक्षिका सौ जी एस कनगुटकर मॅडम यांनी स्वागत व सन्मान केला. Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School

मुख्याध्यापिका सौ एस एस कांबळे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. तसेच विद्यालयातील सहायक शिक्षक श्री व्ही ए ढोणे सर यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी विचार व्यक्त केले. उपस्थित मान्यवर श्री एस एस कांबळे सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयामध्ये कवी आपल्या भेटीला या उपक्रमातून कवी साहित्यिक मा श्री राजेंद्र आरेकर यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. त्यांची नवा ऋतू ही कविता बालभारतीच्या इ ६ वी च्या पाठयपुस्तकात मराठी द्वितीय भाषा ( इंग्रजी माध्यम ) यामध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे. Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School

त्यानंतर उपस्थित मान्यवर कवी श्री राजेंद्र आरेकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन केल्याची त्यांनी घोषणा केल्या वर ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाला गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण रणदिवे यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School
या कार्यकमाचे सूत्रसंचलन श्री पी बी जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन सौ एम एन खानविलकर मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ जे .डी . देवकर मॅडम, श्रीमती भोसले मॅडम व सर्व शिक्षकांचे योगदान लाभले. Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School
