गुहागर, ता. 14 : तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. जानवळे मधलीवाडी आणि शृंगारतळी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Cases registered against illegal liquor sale
गुहागर तालुक्यातील जानवळे मधलीवाडी येथे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. प्रविण कृष्णा कानसे (वय ६३, रा. जानवळे मधलीवाडी, ता. गुहागर) यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या खोपटीत विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रितेश परहाटे यांनी फिर्याद दिली असून, गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई शृंगारतळी येथील पेट्रोलपंपालगत असलेल्या पडक्या चाळीच्या मागील बाजूस करण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश शंकर टाणकर (वय ४७, रा. पालपेणे तळ्याचीवाडी, ता. गुहागर) यांच्याकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. Cases registered against illegal liquor sale
या कारवाईत एकूण ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ५५० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार यांनी फिर्याद दिली असून, गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Cases registered against illegal liquor sale