• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 October 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ह.भ.प. संतोष दळवी महाराज यांना शरदरत्न पुरस्कार

by Mayuresh Patnakar
October 12, 2026
in Guhagar
20 0
0
Santosh Dalvi receives Sharadratna Award
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र वैकुंठवासी ह. भ. प. रामचंद्र महाराज दळवी यांचे चिरंजीव व कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज रामचंद्र दळवी यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने विशेष कीर्तनकार सन्मान शरद रत्न पुरस्कार शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भजन सम्राट राजाराम बुवा शेलार यांच्या संकल्पनेतून ह. भ. प. अंकुश महाराज कुमठेकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय ज्येष्ठ नेते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांच्या हस्ते मुंबई दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. Santosh Dalvi receives Sharadratna Award

कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज रामचंद्र दळवी हे वारकरी संप्रदायाचे पाईक असुन वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पवित्र तुळशीची माळ गुरुवर्य वैकुंठवासी ह. भ. प. आत्माराम बाबा सोलकर यांच्या हस्ते घेतली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचा ध्यास घेतला. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर निरपेक्ष किर्तन सेवा संस्था मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. संप्रदायामध्ये गायन, वादन, किर्तन सेवा करुन सांप्रदायाचे व गावचे नाव मोठे करत आहेत. Santosh Dalvi receives Sharadratna Award

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने उल्लेखनीय योगदान देत समाजाच्या प्रगतीत मोलाची भर घालणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या वर्षी पासून विशेष कीर्तनकार सन्मान- २०२६ प्रदान करण्यात आला. किर्तन क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान आला असल्याचे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक भजनसम्राट कोयनारत्न ह.भ.प राजाराम बुवा शेलार यांनी सांगितले. Santosh Dalvi receives Sharadratna Award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSantosh Dalvi receives Sharadratna Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.