• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अनधिकृत गॅस कनेक्शन व रेशन कार्ड तक्रारींची चौकशी करा

by Mayuresh Patnakar
October 5, 2026
in Ratnagiri
173 2
0
Inquiry into gas connection and ration card complaints
340
SHARES
972
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी, ता. 05 : अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. Inquiry into gas connection and ration card complaints

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून सर्व विभागांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत बिल्डरविरोधात दाखल तक्रारीवर एमएसआरडीसीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले. Inquiry into gas connection and ration card complaints

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा

बैठकीदरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा घेण्यात आला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन ही महत्त्वाची संधी असल्याचे सांगत, सर्व विभागांनी आठवडाभरात आपले दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून निधी जमा करावा व आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले. Inquiry into gas connection and ration card complaints

या लोकशाही दिनाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते. Inquiry into gas connection and ration card complaints

Tags: GuhagarGuhagar NewsInquiry into gas connection and ration card complaintsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.