गुहागर, ता. 05 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ गावचे सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांच्या सामाजिक, शिक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय “आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कारात शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सरपंच जनार्दन आंबेकर यांना सन्मानित करण्यात आले. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे रविवार दि. ४ ऑक्टोबर २०३६ रोजी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य गणेश कुलकर्णी सर यांच्या हस्ते व राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद सर, लोकनेते वैभवजी खेडेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी उमराठ ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व साईस दवंडे हे सुद्धा उपस्थित होते. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
उच्च शिक्षित, समंजस, अभ्यासू, पर्यावरण प्रेमी व्यक्तीमत्व असलेले जनार्दन आंबेकर हे नोकरी करताना देशातील नामांकित ऑईल कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये सेक्शन ऑफिसर पदावर कार्यरत होते. नियतकाळीन सेवानिवृत्ती नंतर ते आपल्या उमराठ या मुळगावी वास्तव्याला आले. त्यांना लहानपणा पासूनच कोकणातील लाल मातीची ओढ आणि समाजकार्याचा प्रचंड आवड होती. सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण उमराठ गावाने बिन विरोध त्यांची सरपंच म्हणून निवड केली. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar

मध्यंतरीच्या काळात जनार्दन आंबेकर यांनी त्यांच्या उमराठ खुर्द आंबेकरवाडीच्या विकास मंडळाचे २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सचिव पद, त्या नंतर उपाध्यक्ष पद आणि अध्यक्ष पद यशस्वीरीत्या सांभाळून उमराठ खुर्द आंबेकरवाडीच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. सद्या ते आंबेकरवाडी विकास मंडळाचे स्थानिक सचिव पदावर काम करीत आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी अन्याया विरूद्ध लढताना गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे सचिव पद, गुहागर तालुका जनता संरक्षण समितीचे सहसचिव पद, दिपस्तभ सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष पद सुद्धा यशस्वीपणे भुषविले आहे. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
ग्रामपंचायत उमराठ मध्ये सरपंच म्हणून काम करताना ग्रामविकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना जनार्दन आंबेकर यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या पुर्वी
१) सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय व निमशासकीय आणि ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी व भरीव कार्य केल्याबद्दल National Rural Development Foundation Belgav या संस्थेतर्फे दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी बेळगाव येथे आदर्श सरपंच म्हणून आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२) मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत (ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) आयोजित स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडाॅल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ दि. १०.१२.२०२३ रोजी प्रदान करण्यात आला.
३) ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नवभारत वृत्त समूहाचे मराठी राष्ट्रीय दैनिक नवराष्ट्रच्यावतीने सरपंच जनार्दन आंबेकर यांना आदर्श सरपंच म्हणून रविवार दि. २४.१२.२०२३ रोजी “सावंत पॅलेस हाॅटेल” रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहे. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
उमराठ गावातील आरोग्य, कृषी, शाळा, अंगणवाड्या, बचत गट, दिव्यांग व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक व आरोग्याच्या कामांसाठी मोफत दाखले उपलब्ध करून देणे, शाळा व अंगणवाडय़ाना सहकार्य करणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे, पर्यावरपूरक उपक्रम राबविणे, आरोग्य व कृषी विषयक मेळावे आयोजित करणे, गावातील पथदिवे व रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे यामुळे ग्रामस्थांना मोठा लाभ झालेला आहे. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
या शिवाय सामाजिक पातळीवर परिवर्तन होण्यासाठी पुर्वापार चालत आलेल्या कालबाह्य व अनिष्ट रूढी, परंपरा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन व ग्रामस्थांना मार्गदर्शन करून विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व विधवाना समाजात मानसन्मान मिळवून देण्यात यशस्वीरीत्या प्रयत्न केले. तसेच सर्व पात्र नागरिकांना रेशनिंग धान्य व शासकीय पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देण्यासही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व साईस दवंडे तसेच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, शासनाच्या प्रत्येक योजना राबवून ग्रामस्थांना त्याचा फायदा कसा होईल याकडे त्यांचा कल असतो. गावातील महिला सबलीकरण, विविध विकास कामे, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निधीतून गावात विविध योजना राबविणे, यामुळे गावाला आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणा व विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या जनार्दन आंबेकर यांच्या कार्याची जिल्हास्तरावर दखल घेत त्यांना हा ” ” आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे उमराठ गावाचे नाव जिल्हास्तरावर पोहचले असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरपंच जनार्दन आंबेकर यांचे सर्व स्तरांवर अभिनंदन होत आहे. Adarsh Vidyaratna Award to Janardhan Ambekar
