गुहागर, ता. 03 : मार्गताम्हाने संचलित कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कला, वाणिज्य व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. ऋतुराज संदीप लांजेकर इ १२ वी सायन्स याची शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दि. २ ऑक्टोंबर २०२६ रोजी कोल्हापूर विभागीय रग्बी स्पर्धा घेण्यात आल्या. या निवड चाचणी मध्ये ऋतुराजने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ‘Rituraj’ qualifies for state-level rugby tournament
ऋतुराज याला मार्गदर्शक प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री राकेश खांडेकर आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे प्रणित सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले या यशस्वी खेळाडू ऋतुराज व क्रीडाशिक्षक राकेश खांडेकर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर चव्हाण सर्व संस्था संचालक, जिल्हा क्रीडाअधिकारी श्री विजय शिंदे, क्रीडा अधिकारी श्री गणेश जगताप, मुख्याध्यापक श्री भाऊ लकेश्री, पर्यवेक्षक श्री विनोद पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘Rituraj’ qualifies for state-level rugby tournament
