• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

by Mayuresh Patnakar
October 1, 2026
in Guhagar
32 0
0
62
SHARES
178
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान – सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि तालुका सहकारी अधिकारी  कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटपन्हाळे हायस्कूल परिसर व शृंगारतळी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘Swachhata Hi Seva’ Campaign at Patpanhale

या कार्यक्रमात प्लास्टिक कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि प्लास्टिकमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम, त्याचे योग्य वर्गीकरण व कंपोस्टिंगचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच प्लास्टिकच्या वापरावर आळा घालण्यासाठी पाटपन्हाळे वि. का. सेवा सहकारी संस्थेच्यावतीने विद्यार्थी व नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेदरम्यान पाटपन्हाळे परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले आणि पुढील विल्हेवाटीसाठी तो पाटपन्हाळे ग्रामपंचायत कचरा गाडीमध्ये सुपूर्द करण्यात आला. ‘Swachhata Hi Seva’ Campaign at Patpanhale

या कार्यक्रमास पाटपन्हाळे विकास संस्थेचे चेअरमन, संचालक, सभासद, शृंगारतळी येथील नागरिक, गुहागर तालुक्यातील सहकारी संस्थांचे सचिव, पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि लेखापरीक्षक उपस्थित होते. या संपूर्ण अभियानात सुमारे ७० हून अधिक जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला, अशी माहिती तालुका सहकारी अधिकारी  प्रियांका माने यांनी दिली आहे. ‘Swachhata Hi Seva’ Campaign at Patpanhale

Tags: 'Swachhata Hi Seva' Campaign at PatpanhaleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.