विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती देण्याचा प्रस्ताव
गुहागर, ता. 25 : शासनाने महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला असून नियुक्तीच्या नियमांतही सुधारणा केली आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. यानुसार तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्यात येईल. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून मुंबईत एक बैठकही झाली. परंतु यात लिपिक संवर्गाचा समावेश नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यांनाही याचा लाभ देण्याची मागणी होत आहे. Talathi to become Naib Tehsildar
महसूल सेवेतील तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करण्यापासून योजना नागरिकांपर्यंत पोहचण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते, सध्या तलाठ्यांना मंडळ अधिकारी पदानंतर नायब तहसीलदावर पदोन्नती देण्यात येते. परंतु आता विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्याचा विचार सुरू आहे. Talathi to become Naib Tehsildar