गुहागर, ता. 25 : नमन लोककला संस्था शाखा – गुहागर यांच्या वतीने स्नेह मेळावा गुहागर बाजार, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेमध्ये कलाकारांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यात आले. नमन मंडळातील ५० वर्षे पूर्ण असणारे जेष्ठ कलाकार यांना शासनामार्फत मिळणारी पेन्शन रूपये ५ हजार रुपये कशाप्रकारे मिळविता येतील आणि कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक सहकार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. Naman Folk Art Institute Guhagar
शासनामार्फत देण्यात येणारे प्रतिवर्षी पेन्शन धारी कलाकार यात वाढ करणे. कलाकारांना मिळणारे पेन्शन ५ हजार रुपये असून त्यात शासनाने वाढ करून करण्यात यावी, प्रतिवर्षी २० मंडळांना मिळणारे ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य (नमन, कलगीतुरा, भजन, भारूड) यावर मंडळाचे रजिस्ट्रेशन असावे ही अट सरकारी दस्तावेजातून शिथिल करणे याबाबत चर्चा करण्यात आली. Naman Folk Art Institute Guhagar
ज्या मंडळाचे शासनाकडे नोंदणी केलेली आहे त्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असे सुचित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार / साहित्यिक प्रशांत डिंगणकर यांनी ज्येष्ठ नमन कलाकारांना यांना शासनामार्फत मिळणाऱ्या मानधनाबाबत माहिती दिली. तसेच नमन लोककला प्रामुख्याने जपत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील नमन कलाकारांसोबत सांस्कृतिक मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन नमन कलाकारांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. Naman Folk Art Institute Guhagar
यावेळी नमन लोक कला संस्था गुहागरचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, बहुसंख्येने असणाऱ्या नमन लोक कलेतील कलाकारांना मानधन मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. अनेक वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव मंजूर होत नाहीत, यासाठी शासनाने जास्तीत जास्त नमन कलाकारांना प्राधान्य देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, अशी विनंती केली. Naman Folk Art Institute Guhagar
यावेळी नमन लोक कला संस्था गुहागरचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार / साहित्यिक प्रशांत डिंगणकर, पत्रकार गणेश किर्वे, संदीप कानसे, सचिव प्रमोद घुमे, उपाध्यक्ष विनायक कांबळे सह कार्यकारणी सदस्य /पदाधिकारी तसेच शाखा मुंबई समन्वयक अनिल रांजाणे, संजय कळंबाटे, संघटक उदय दणदणे, अमित काताळे, प्रशांत भेकरे अनेक नमन मंडळांचे प्रतिनिधी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नमन लोककला संस्था शाखा – गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सभेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सर्व नमन कलाकारांचे आभार मानत सभेची सांगता केली. Naman Folk Art Institute Guhagar
