• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 September 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सायंकाळी पडणारा पाऊस भात व नाचणी पिकाला पूरक

by Mayuresh Patnakar
September 24, 2026
in Ratnagiri
16 0
0
Evening rain is beneficial for agriculture
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शेतकरीवर्गातून समाधान

रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर पडणारा पाऊस भात व नाचणी पिकासाठी अत्यंत पूरक असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. जून महिन्यामध्ये लागवड झालेल्या भातपिकाला आता लोंबी आली आहे. त्यामुळे पाण्याची गरज भासत होती. दरम्यान गेले दोन दिवस वीजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे. हलव्या भात शेतीला पावसाची गरज होती. अजून लोंबी फुटलेली नाही, अशा भातपिकाला पाऊस पडत असल्याने पूरक ठरणार आहे. Evening rain is beneficial for agriculture

कोकणात कातळावरची भातशेती व नाचणी पिक पाऊस नसल्याने कोमेजून जाणार होतेच मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाने कातळावर बर्‍यापैकी पाणी पडले आहे. त्याचा उपयोग शेतीला होणार आहे. जून महिन्यामध्ये आंबा आणि काजू झाडांना टाकलेल्या खतामुळे पाण्याची गरज होती. सध्या पडत असलेल्या पावसाने कोकणातील बागायतींमधील आंबा झाडांना नवी पालवी फुटल्याचे दिसून येतेय. त्यामुळे पावसाचा दीर्घ परिणाम आंबा पिकावर होईल, असे म्हटले जाते. Evening rain is beneficial for agriculture

कोकणात १५ ऑक्टोबरपर्यंत अधूनमधून पाऊस पडेल, हा पाऊस शेतीपूरक ठरेल, असे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. सायंकाळी पडणार्‍या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. प्रतिवर्षी भात कापणीच्या वेळी सायंकाळी पडणारा पाऊस अजून भातपिक तयार झाले नसताना पडत असल्याने भातपिकाला धोका निर्माण होण्याची शक्यताही काही शेतकर्‍यांना वर्तविली आहे. Evening rain is beneficial for agriculture

Tags: Evening rain is beneficial for agricultureGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.