• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणात भात-नाचणीचे मोठे नुकसान

by Mayuresh Patnakar
September 22, 2026
in Guhagar
28 0
0
Major damage to rice and finger millet crops
55
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

गुहागर, ता. 22 : कोकणात यंदा कमी आणि अनियमित पर्जन्यमानामुळे भात व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोकणासाठी तातडीने विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. Major damage to rice and finger millet crops

यावर्षी राज्यात आवश्यक प्रमाणात पाऊस झालेला नसून, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पडलेला पाऊस दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी कमी असल्याने कोकणातील भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या संकटावर उपाय म्हणून राज्य सरकारने कोकणातील उपलब्ध पाणीसाठ्यांचे – तातडीने संवर्धन व नियोजन करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना आखावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. Major damage to rice and finger millet crops

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आमदार श्री. जाधव यांनी म्हटले ले आहे की, यंदाचा खरीप हंगाम कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरला आहे. विशेषतः कोकणातील प्रमुख पिके असलेल्या भात आणि नाचणीवर कमी व अनियमित पावसाचा मोठा परिणाम झाला. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने भाताची लागवड नियोजित वेळेपेक्षा उशिरा करावी लागली. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करून बियाणे, खते, औषधे, मजुरी तसेच शेतीच्या मशागतीसाठी खर्च केला. मात्र लागवडीनंतरही पावसाची स्थिती समाधानकारक राहिली नाही. त्यामुळे भात व नाचणी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके गर्भात असतानाच पाण्याअभावी सुकून गेली आहेत. Major damage to rice and finger millet crops

यंदाच्या कमी पावसाचा परिणाम केवळ हंगामी पुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करून कोकणातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी. Major damage to rice and finger millet crops

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMajor damage to rice and finger millet cropsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.