गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर येथील समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे यांने स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. 100 मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार 17.93 सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची नोंद करत समर्थ यांने नवा इतिहास घडवला आहे. त्यामुळे देवघर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. Samarth Shinde’s success in the field of skating
लहान वयात स्केटिंग क्षेत्रात आवड निर्माण असणाऱ्या समर्थने सराव करत शिस्त, चिकाटी आणि जिद्दीने जागतिक विक्रम केला असून आई-वडिलांच्यासह देवघर गावाचे, गुहागर तालुक्याचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव चमकवले आहे. समर्थच्या या उज्वल यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थ चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Samarth Shinde’s success in the field of skating
