• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे खरेकोंड येथील सचिन साळवी यांना समाजभूषण पुरस्कार

by Mayuresh Patnakar
September 12, 2026
in Guhagar
22 0
0
Sachin Salvi gets Samaj Bhushan Award
43
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील आदर्श किर्तनकार ह. भ. प श्री. सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेर्डी यांच्या सयुक्त विद्यमाने देऊन सन्मानीत करण्यात आले. संत शिरोमणी गोरोबा काका सभागृह सौरभ चेम्बर्स दुसरा मजला चिपळूण -कराड रोड वरची पेठ खेर्डी ता. चिपळूण येथे प्रतिष्ठित मान्यवर मान.प्रकाशशेठ निवळकर (चिपळूण तालुका कुंभार समाज अध्यक्ष व चैतन्य हाँटेलचे मालक )यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. Sachin Salvi gets Samaj Bhushan Award

ह. भ. प श्री. सचिन साळवी महाराज आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर फड श्री. क्षेत्र पंढरपूर. आळंदी या फडाचे ते वारकरी असून गेली चौवीस वर्ष किर्तन भजन प्रवचन क्षेत्रात ते सेवा करत आहेत. कोकण तसेच घाटमाथा परिसरामध्ये त्यांनी किर्तन प्रवचन सेवा केली. ते म्हणाले सन्मान हा केवळ शाल -पुष्पाचा नसतो तो आपल्या सेवेची मिळालेली प्रेमळ पोचपावती असते. मान . प्रकाशजी निवळकर यांच्या हस्ते माझा झालेला हा सन्मान आमच्या साठी केवळ कौतुकाचा क्षण नाही तर निष्ठेने, ताकदीने, जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. शेवटी ते म्हणाले हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मदत केली त्या सर्वाचा आहे. Sachin Salvi gets Samaj Bhushan Award

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. सतीश दादा दरेकर श्री. रमाकांत क्षीरसागर तसेच प्रमुख उपस्थित म्हणून डॉ.सुरेशजी काळे श्री. पुंडलिक सोनावणे श्री. वसंतराव कुंभार श्री. अण्णा राहुकर श्री. वसंतराव धोडनदीकर श्री. सत्यवान वाळके श्री. अंनत महाडकर श्री. सुरेश बोरस श्री महेश सायकर श्री. भरत शिरसाठ  श्री अंनत कुंभार श्री. प्रकाश भालेराव श्री रामदास कुंभार श्री. विलास गुडकर श्री. भानुदास गोर्डेकर श्री. भास्कर कल्याणकर दिपक शिरकर वासुदेव साळवी त्याच प्रमाणे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. Sachin Salvi gets Samaj Bhushan Award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSachin Salvi gets Samaj Bhushan Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.