• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्ते सुरक्षेसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा अनोखा उपक्रम

by Mayuresh Patnakar
September 11, 2026
in Guhagar
43 0
0
Lions Club's initiative for road safety
84
SHARES
239
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या गुरांच्या सुरक्षिततेसाठी एक आगळावेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेल्या किंवा फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालकांना गुरे स्पष्टपणे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. ही समस्या लक्षात घेऊन गुरांच्या गळ्यात Fluorescent Reflective Belts (प्रकाश परावर्तित करणारे पट्टे) लावण्यात आले. Lions Club’s initiative for road safety

Lions Club's initiative for road safety

या उपक्रमांतर्गत शृंगारतळी परिसरातील जवळपास १०० गुरांच्या गळ्यात हे बेल्ट लावण्यात आले. वाहनांच्या प्रकाशात हे पट्टे चमकत असल्याने रात्रीच्या वेळी गुरे वाहनचालकांना लांबूनच स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर स्वतः उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले. तसेच लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. Lions Club’s initiative for road safety

Lions Club's initiative for road safety

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLions Club's initiative for road safetyMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet21
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.