• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 September 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात उमेद अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव

by Manoj Bavdhankar
September 10, 2026
in Guhagar
33 0
0
Wild Vegetable Festival
64
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिलांच्या स्वावलंबनाला पंचायत समितीचा हातभार

गुहागर, ता. 10 : महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटांना मदत करणे हे आमचे काम आहे. तालुक्याचे ठिकाण आणि पर्यटनामुळे वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी पंचायत समितीशेजारील शाळेच्या जागेत बचत गट भवन उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पंचायत समिती सभापती प्रणव कोळेकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. Wild Vegetable Festival

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे म्हणाले की, पूर्वी रानभाज्या खाणे ही गरज होती. मात्र आज रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराच्या काळात नैसर्गिक रानभाज्यांचे सेवन ही काळाची गरज बनली आहे. फणस, काजू तसेच रानभाज्यांसारखे हंगामी पदार्थ फ्रोजन पद्धतीने तयार करून वर्षभर विक्री करता येऊ शकते. यातून महिलांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. रानभाज्यांपासून विविध पदार्थ तयार करण्याच्या पद्धती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्याचे पुस्तक प्रकाशित करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. Wild Vegetable Festival

महोत्सवात बचत गटांच्या माध्यमातून रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये प्रथम ऋतुजा डिंगणकर वरवेली (भारंगीच्या भाजीपासून करंजी) द्वितीय अक्षता गुजर देवघर (भाजीचे कटलेट) तृतीय विभागून सुचित्रा भोसले आरे व संयुक्ता मोरे नरवण (टाकळ्याच्या भाजीचे मोदक) उत्तेजनार्थ सुप्रिया देसाई वरवेली (वरीचा केक) यांची निवड करण्यात आली. Wild Vegetable Festival

यावेळी नाचणीची इडली, ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा, भारंगीच्या भाजीची भाकरवडी टाकळ्याच्या भाजीचे लाडू व मोदक शेवग्याच्या शेंगाच्या वड्या आदी पदार्थांना विशेष पसंती मिळाली. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, सारिका दाभोळकर व उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. Wild Vegetable Festival

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWild Vegetable Festivalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.