• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 September 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मीटरची जोडणी करुन पथदीप हस्तांतरीत करा

by Mayuresh Patnakar
September 10, 2026
in Guhagar
36 1
0
National Highways Sub-Division's letter to Patpanhale Gram Panchayat
71
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला पत्र

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शृंगारतळी येथील महामार्गालगतची पथदिपांची थकीत वीज बिलांची रक्कम भरण्यात आल्याने नवीन मिटरची जोडणी ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने करून हे पथदीप हस्तांतरीत करून घेण्यात यावेत, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला पाठविले आहे. ग्रामपंचायत याबाबत काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. National Highways Sub-Division’s letter to Patpanhale Gram Panchayat

गुहागर-चिपळूण-कराड रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई वरील ग्रामपंचायत पाटपन्हाळे हद्दीमधील शृंगारतळी येथील पथदिपांचे विजबील थकल्यामुळे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत ग्रामपंचायतीकडून सातत्याने महामार्ग विभागाकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरु होता. या पत्रांना अनुसरुन या विभागाने ग्रामपंचायतीला पत्र पाठवून पथदिप सुरु करण्याकरीता कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्यात आला असून सदर वीज बिलाची रक्कम वरीष्ठ कार्यालयाकडून भरण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी सदर मीटरची जोडणी ही कंत्राटदाराच्या नावावर होती. परंतु पथदिप बंद होऊन जास्त कालावधी झाला असल्याने मीटरची जोडणी कायमस्वरूपी खंडित करण्यात आल्याने नवीन मीटरची जोडणी करावी लागणार असल्याचे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. National Highways Sub-Division’s letter to Patpanhale Gram Panchayat

या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, दि. २७/०५/२०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मौजे शृंगारतळी येथील पिकपशेड व पथदिपांबद्दल संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीत पथदिपांचे प्रलंबित विजबिल देयक राष्ट्रीय महामार्ग विभागाने अदा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय पथदिप हस्तांतरीत करून घेण्यास तयार असल्याचे सांगण्यात आल्याचे महामार्ग विभागाने पत्रात म्हटले आहे. त्यामुळे थकित वीज बीलाची रक्कम भरण्यात आल्याने नवीन मीटरची जोडणी ही ग्रामपंचायत पाटपन्हाळे कार्यालयाच्या नावाने करून पथदिप आपल्याकडे हस्तांतरीत करून घेण्यात यावेत, असे महामार्ग विभागाने पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळविले आहे. आता ग्रामपंचायत याबाबत कोणता निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. National Highways Sub-Division’s letter to Patpanhale Gram Panchayat

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNational Highways Sub-Division's letter to Patpanhale Gram PanchayatNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.