• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

१५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होण्याचा अंदाज

by Mayuresh Patnakar
September 9, 2026
in Ratnagiri
16 0
0
गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गणेशोत्सवासाठी कोकणात ६ हजारांहून अधिक एसटी बसेस धावणार

गुहागर, ता. 09 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून तब्बल १५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली असून, मुंबई-पुण्यातून कोकणपट्ट्यात ६ हजारांहून अधिक एसटी बसेस धावणार आहेत. यापैकी सुमारे साडेचार हजार बसेस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. ST Corporation fully geared up for Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या काळात चिपळूण शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चिपळूण एसटी आगाराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या शिवाजीनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकडून एसटीच्या आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, चिपळूण आगारातून आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता आवश्यकतेनुसार अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची तयारीही एसटी प्रशासनाने ठेवली आहे.  ST Corporation fully geared up for Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या स्वागतासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले असून, प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. ST Corporation fully geared up for Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarST Corporation fully geared up for Ganeshotsavटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.