• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात मध्यरात्री बामणे यांच्या घराला आग

by Mayuresh Patnakar
September 9, 2026
in Guhagar
88 1
0
Fire at Bamne's house in Guhagar
174
SHARES
496
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तरुणांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला, लाखो रुपयांचे नुकसान

गुहागर, ता. 09 : शहरातील खालचापाट परिसरातील बामणे कुटुंबाच्या घराला मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले असून सुमारे 13 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, स्थानिक तरुणांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. Fire at Bamne’s house in Guhagar

मंगळवारी कानडे यांच्या घराबाहेर वेदांग कनगुटकर, विराज शिंदे, शुभम शिंदे, धनराज ओक, स्वानंद दिक्षित, आर्य खोत हे सहा तरुण गप्पा मारत बसले होते. मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास सचिन बामणे यांच्या घराच्या माळ्यावर त्यांना उजेड दिसला. हा उजेड ब्लबचा नाही, असे लक्षात आल्यावर तरुणांनी बारकाईने पाहीले. तोवर माळ्यावरील आगीने भिषण स्वरुप घेतले होते. या तरुणांच्या समोरच पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या काचाही फुटल्या. आग भिषण असल्याचे लक्षात येताच तरुणांनी याच घराच्या मागे रहाणाऱ्या संतोष बामणे यांचा मुलगा धीरजला फोन करुन उठवले. त्यानंतर धीरजला सोबत घेवून सचिन बामणे यांच्या घरातील सर्वांना उठवून घराबाहेर काढले. सचिन बामणे यांच्या घरात दोन वयोवृध्द व्यक्ती आहे. त्यापैकी सचिन व संतोषच्या आईला चालताही येत नाही. या तरुणांनी या दोन वृध्दांना बाहेर काढण्यास मदत केली. अन्य ग्रामस्थांना कळवले. तरुणांच्या या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.  Fire at Bamne’s house in Guhagar

Fire at Bamne's house in Guhagar

संतोष बामणे व सचिन बामणे यांचे एक किराणा मालाचे दुकान वराती मंदिराजवळ आहे. तसेच एक छोटे दुकान घराशेजारीच आहे. गणेशोत्सव आल्याने पोट माळ्यावर (पहिल्या मजल्यावर) प्लास्टीकच्या वेष्टनातील खाऊ, गुळ, कडधान्य आदी खरेदी केलेला जिन्नस मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता. रात्री पहिल्या मजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्कीटच्या ठिणग्या याच जिन्नसामधील प्लास्टीकच्या वेष्टनातील सामानावर पडल्या आणि आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे.  पहिला मजला आणि कौलारु घराचे छत लाकडाचे असल्याने आगीने रौष्द्ररुप धारण केले. पहिला मजल्यावरील आग अवघ्या अर्ध्या तासात मुख्य घरापर्यंत आली. वरुन पेटणारी लाकडे खाली पडत असतानाही दोन तरुणांनी मुख्य घरातील सिलेंडर जीव धोक्यात घालून बाहेर काढले. मात्र अन्य मौल्यवान सामान, कागदपत्रे, दुकानासाठी लागणारे साहीत्य हे सर्व बेचिराख झाले. Fire at Bamne’s house in Guhagar

Fire at Bamne's house in Guhagar

घटनेची माहिती मिळताच आरजीपीपीएल आणि कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच बामणे कुटुंबीयांच्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भर सणासुदीच्या दिवसांत हक्काचे घर जळून खाक झाल्याने बामणे कुटुंबीयांवर आता दुसऱ्याच्या घरात आसरा घेण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. Fire at Bamne’s house in Guhagar

Fire at Bamne's house in Guhagar

ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या मदतकार्यात नगरसेवक राजेंद्र भागडे यांनी पाण्याचा पुरवठा करून मोलाचे सहकार्य केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच सीआयएसएफचे जवान यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली. Fire at Bamne’s house in Guhagar

Fire at Bamne's house in Guhagar

Tags: Fire at Bamne's house in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.