गुहागर, ता. 08 : चिपळूण येथे १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या चिपळूण मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याच्या मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक बाबी चर्चेला येत असल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभाग सर्व बाजूंनी तपास करणार आहेत. आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. Assets of the corrupt Rajeshirke to be investigated
राजेशिर्के याच्या जामीन अर्जावर ७ रोजी सुनावणी होणार आहे. ५ खरेदीखताची सातबाऱ्यावर नोंद करून ऑगस्टला जमिनीच्या फेरफार मंजूर करण्यासाठी सावर्डेचा मंडळ अधिकारी अनिल जाधव ५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. त्याने ८ दिवस जेलची हवा खाल्यानंतर काही दिवसांपूर्वी सातबारा फेरफारच्या कामांसाठी १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचा मंडळ अधिकारी विशेष म्हणजे या दिवशी येथील दौऱ्यावर कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल या होत्या. तरीही लाच स्वीकारली गेल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न उभा ठाकला असून हे प्रकार नेमके कोणाच्या आशीर्वादाने होतात याचाही लाचलुचपत विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी आता होत आहे. Assets of the corrupt Rajeshirke to be investigated
राजेशिर्के हा महसूल प्रशासनातील अनुभवी अधिकारी असून त्याच्या कामाची पद्धतही चांगली होती. अशी चर्चा असतानाच तो आता लाचखोर ठरल्याने त्याच्यावर मोठी टीका होत आहे. यातूनच अनेकजण त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. त्याच्या अटकेनंतर रंगलेल्या चर्चा लक्षात घेता लाचलुचपत विभागही लवकरच त्याच्या व त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर ७ रोजी सुनावणी होणार आहे. Assets of the corrupt Rajeshirke to be investigated