गुहागर हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
गुहागर, ता. 05 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य, कै. विष्णुपंत पवार कला व कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. विनायक जाधव यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध करिअरच्या वाटांबाबत सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले. Career Guidance at Guhagar High School
दहावीनंतरच्या शिक्षणाची योग्य दिशा मिळावी तसेच विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता व भविष्यातील संधी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड करावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. गंगावणे सर तसेच श्री. वैभव ढोणे सर उपस्थित होते. Career Guidance at Guhagar High School

कार्यक्रमामध्ये श्री. वैभव ढोणे सर यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध शैक्षणिक संधींबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता व कौशल्ये ओळखून करिअरची योग्य निवड कशी करावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सौ. राधा शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी, पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध पर्याय तसेच उज्ज्वल भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. Career Guidance at Guhagar High School
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायक जाधव सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. राधा शिंदे मॅडम यांनी केले. हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षण व करिअर निवडीसाठी योग्य दिशा व आत्मविश्वास मिळाला. Career Guidance at Guhagar High School
